न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था व स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण

तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील उखर्डां येथे
स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशन व न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या संयुक्त विद्यमाने उखर्डा येथे वृक्ष रोपण करण्यात आले. स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जितेश कायरकर यांनी वृक्ष लागवड साठी ५० वृक्ष दीले . न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था तर्फे आज वृक्ष रोपण करण्यात आले. शंकर जी मंदिर परिसरातील जागेवर वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी ३० वृक्षांची लागवड केली या मध्ये निंब,करंजी, गुलमोहर अश्या प्रकारची झाडे होती. तसेच मंदिर परिसरातील व आजुबाजुला प्लास्टिक पिशव्या व तन गवत उचलून स्वच्छता अभियान राबविण्यात आले . राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित प्रभाकरराव कुडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी च वृक्ष रोपण, रक्तदान , श्रमदान अश्या विवीध सामाजिक उपक्रम न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था राबवत असते . “माझे गाव हिरवे गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करणार असा मानस संस्थेचा आहे. संस्थापक अध्यक्ष अमोल घोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने संस्था नेहमी वृक्ष लागवड करत असते व लावलेल्या वृक्षांची जोपासना संस्थेचे युवक करतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे , फुल न फुलाची पाकळी जेव्हढे शक्य आहे तेवढे निसर्गाचे संवर्धन करा असे आवाहन अभिजित कुडे यांनी केलं. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे, न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे सचिव रोशन भोयर, विनोद कोठारे, विजय कुडे, कार्तिक राऊत, ऋषिकेश कुडे, सागर डोमकावडे, साहिल पानतावणे, नरेश डोमकावडे, विशाल राऊत, समीर राऊत , रंजीत कुडे, प्रमोद कुडे उपस्थित होते.