जननायक बिरसा मुंडा यांचे कार्य आणि विचार तरुणांनी आत्मसात करावे-इंजि. मंगेश पुरणनाथ मेश्राम

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी
कोणताही महामानव हा सर्वसामान्यांसारखाच जन्म घेत असतो. परंतु स्वतःच्या प्रज्ञेच्या बळावर तो सर्वांना प्रणेता ठरत असतो. इतिहासाला स्मरण व्हावं अशी फार कमी लोक आजवर झाली आहे, त्यातील एक नाव म्हणजे, ‘बिरसा मुंडा’ उर्फ ‘धरतीआबा’ होय. इंग्रजांशी झुंज पलीकडे त्यांच्या दृष्टिकोनाबाबत आजवर फार कमी आणि क्वचित लोकांनीच विचार केलेला आढळतो.

आदिवासी समूहाचा स्वातंत्र्य संग्रामात सिंहाचा वाटा असतांना बिरसा सारखे प्रणेते इतिहासाच्या पुस्तकात अनुल्लेखाने मारणे ही राष्ट्राच्या जडणघडनीतली बाधा आहे. बिरसा मुंडा तारुण्यात सामान्यांतून प्रतिभावंत माणूस घडण्याच्या प्रवासातलं फार तेजस्वी आणि आदर्शवादी उदाहरण आहे. शौर्य, करुणा, बुद्धी, संस्कृतीची ओळख, राष्ट्रप्रेम आदी अनेक गुण बिरसा मुंडा आज ही आमच्या मनात अंकुरत असतो असे विचार भाजपा अनु. जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम यांनी जय वीर बिरसा मुंडा मंडळ खुर्षीपार /बांध व नवयुवक उत्सव मंडळ खुर्षीपार आयोजीत जननायक वीर बिरसा मुंडा जयंती आयोजीत कार्यक्रमात व्यक्त केले .
याप्रसंगी सोबत बुथ प्रमुख खुर्षीपार अशोकजी घोनमोडे, बुथ प्रमुख कनेरी धनराज मेश्राम, भाजयुमो शाखा प्रमुख धनूभाऊ घोनमोडे, मनोज मळकाम, घनश्याम मडावी, नितेश कुथे, सचिन कुथे, विश्वनाथ धुर्वे, मोहित बांडेबुचे, उपसरपंच मानेगाव पंकज चेटुले, आकाश निखाडे उपस्थित होते.