ताज्या घडामोडी
पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम जमा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आज दि. 30/12/2015 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्राँग रूममधून पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे (EVM) कल्याण मंडप येथील ईव्हीएम कक्षात जमा करण्यात आली. ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गंगाखेड जीवराज डापकर यांच्या उपस्थितीत झाली.

या वेळी ईव्हीएम कक्षाचे नोडल अधिकारी प्रशांत थारकर, दिनेश भंडे, सोहेल सिद्दीकी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व कामकाज शांत व नियोजित पद्धतीने पार पडले.









