ताज्या घडामोडी

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत गावखेड्यात मदत करणारेच गायब

ग्रामीण भागातील गरीब मजुरासमोर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न ?

मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे

मागील वर्षीच्या कोरोनाच्या संकट काळी ग्रामीण भागातील गावखेड्या पाड्यापर्यंत पुढारी,सामाजिक संघटना,गांव कार्यकर्ते यांनी आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला होता.परंतु यंदा मात्र कोणीच कुणाला मदत करताना गांव-खेडयात दिसत नाही.

कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेत मदत करणारे गायब झाल्याचे चित्र सद्या ग्रामीण भागात बघायला मिळत आहे. मागील वर्षीच्या निवडक लग्नांमध्ये व गरजूंना जिल्ह्याचे पालकमंत्री,विद्यमान आमदार, राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व समाजातील सुदृढ या नागरिकांनी गोरगरीब गरजू विधवा महिलांना अन्य धान्य तेल तिखट मीठ तांदूळ साखर पीठ आदी विविध वस्तू वाटप केल्या होत्या. कुणीही उपाशी राहू नये यासाठी सर्वजण काळजी घेत होते.मात्र यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोरगरीब मुजरा कडे पैसे नसताना त्यांना मदतीचा हात देण्यास कुणीही पुढे येत नसल्याचे चित्र गावखेड्यात दिसत आहे.ग्रामीण भागातील लोकांना आता दोन वेळच्या जेवणाची समस्या भेडसावत दुसरीकडे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न भेडसावत आहे.मागच्या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये गोरगरीबना मदत करून सोशल मीडिया वर फोटोसेशन करणाऱ्याची यां वर्षी मात्र मदतीचा हात आखडता घेतला आहे.मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य आत्ताही त्यांच्याकडून संपले तर नसावे किव्हा धान्य देण्याचा विचार झालेला तर नसावा असे सद्या चित्र दिसते आहे. मागील वर्षी मध्ये केंद्र व राज्य सरकारने शिस्तबद्ध तालुक्यातील गावागावात नागरिकांना मदतीचा हात दिला मोफत धान्य वाटप केले होते.सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता मात्र कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेत सर्व कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने सोशल डिस्टन गोष्टींचे पालन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे गरज वनतांना आता खरी मदतीची गरज आहे.

सामाजिक संघटना कार्यकर्ते गेले कुठे गेल्या वर्षी कोरना काळात अनेक सामाजिक संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गरजवंतांना मदत केली मात्र काहींनी केवळ फोटोसेशन कृतीच मदत केली त्यांनी मदत केल्याचा प्रचंड आव आणला काही सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी मात्र प्रामाणिकपणे मदत केली. आणि काही नि मदतीचा थांगपत्ता लागू दिला नाही यावर्षी पुन्हा या कोरोनाने चंद्रपुर जिल्ह्यत ग्रामीण भागात आक्रमण केले आहे. अशा वेळी मदत करणाऱ्या प्रामाणिक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे मात्र सर्व संघटना व कार्यकर्ते गेले कुठे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close