मानवत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत साहित्यिक कवी कलावंत प्रबोधनकार व समाज सुधारक लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांची जयंती (दि.१) वार सोमवार रोजी महाराणा प्रताप चौक मानवत येथून काढण्यात आली सर्वप्रथम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमे ला पुष्पहार टाकून मुख्याधिकारी जयवंत सोनवणे ,नगर परिषद चे अभियंता अन्वर भाई ,समाजसेवक गणेश मोरे ,मान्यवरानी अभिवादन केले…
महाराणा प्रताप चौक ते मेन रोड वरून जयंती ही मानवत नगर परिषद येथे विसर्जन करण्यात आले…
व त्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस सह.निरीक्षक फिरोज पठाण यांनी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी, स्वच्छता निरीक्षक ओम चव्हाण, समाजसेवक आनंत मामा भदर्गे, समाजसेवक गणेश मोरे ,यांची उपस्थिती होती….
तसेच मानवत शहरात ठीक ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन ही करण्यात आले….
व यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी अर्जुन झिंजरुटे, बाळू सौदागर, जनार्धन कीर्तने, पांडुरंग चव्हाण, सिताराम कांबळे, नितीन नवगिरे, अभिषेक रोकडे, पांडुरंग पवार ,मारुती साठे, डॉ. मारुती टाक, अमोल सूर्यवंशी ,आनंद आवचार ,चंद्रभान तांबे, रामचंद्र गायकवाड, मारुती नवगिरे ,रमेश साळवे ,इत्यादीने परिश्रम घेतले प्रास्ताविक ग्रामसेवक संदिपान घुंबरे यांनी तर सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक ए.आर.टेंगसे यांनी केले