ताज्या घडामोडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र व नवजीवन विधी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन व सामंजस्य करार संपन्न

प्रतिनिधी:अहमद अन्सारी

नाशिक- ग्राहक पंचायत महाराष्ट्र व नवजीवन विधी महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने उद्घाटन समारंभ व भविष्यातील ग्राहकाभिमुख विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत सामंजस्य करार संपन्न झाला.
 नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे नवजीवन विधी महाविद्यालय, शिवशक्ती चौक, सिडको, नवीन नाशिक येथे ग्राहक मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन  ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष मा. डॉ. विजयजी लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक विभाग अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, विभाग संघटक श्री. सतीश शुक्ल, नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. विजयजी काळे, सदस्या सौ. मंगला पवार नवजीवन विधी महाविद्यालयाचे  प्राचार्या डॉ.शाहिस्ता इनामदार, प्रा. एम. एस. पांडे, नाशिक विभाग सह संघटक अँड. सुरेन्द्र सोनवणे व आदर्श शिक्षिका श्रीमती प्रमिलाताई पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाला.
तसेच यावेळी ग्राहक जागृती,  प्रचार,  प्रसार व प्रबोधन कार्यासाठी भविष्यातील ग्राहकाभिमुख विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र व नवजीवन विधी महाविद्यालय, नाशिक यांच्यात  सामंजस्य करार (MOU) करण्यात  आला या करारावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे वतीने राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड व नवजीवन विधी महाविद्यालयाचे वतीने प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार यांनी सह्या केल्या. डॉ. विजय लाड यांनी उपस्थित मान्यवरांना ग्राहक पंचायत महाराष्ट्रची माहिती व कार्य दिशा हि पुस्तिका भेट देण्यात आली.   
डॉ. विजय लाड यांनी आपल्या भाषणात ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या कार्याबद्दल माहिती देवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने २४ डिसेंबर २०२२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ७५ मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती दिली. प्रबोधनाच्या दृष्टीने शाळा व महाविद्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कार्यकर्त  व्याख्यानांचे आयोजन देखील केले जाणार आहे असे सांगितले.
नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. विजयजी काळे यांनी आपल्या भाषणात ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या ग्राहक जागृती व प्रबोधन कार्यासाठी नवजीवन एज्युकेशन सोसायटी व विधी महाविद्यालयात ग्राहकाभिमुख विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगून विध्यार्थान सोबतच नाशिक शहर  व  परिसरातील नागरिकांना या ग्राहक  मार्गदर्शन केंद्रातून मोफत सल्ला व मार्गदर्शचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
नवजीवन विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र व नवजीवन विधी महाविद्यालय, नाशिक यांच्यातील झालेल्या सामंजस्य करार (MOU) बाबत सविस्तर माहिती देवून विद्यार्थ्यांनी तरुणांनी ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे गरजेचे आहे. असे सांगून महाविद्यालयाच्या भविष्यातील उपक्रमांबाबत माहिती सागितली.
या कार्यक्रमास नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सौ. विजया देशमुख  व मुख्य विश्वस्त श्री. सुभाष देशमुख ( बडे सर ) यांनी शुभेछ्या दिल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. एस. पांडे सर यांनी केले. व आभार प्रदर्शन प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार यांनी केले.
या कार्यक्रमास ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष मा. डॉ. विजयजी लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक विभाग अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, विभाग संघटक श्री. सतीश शुक्ल, नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. विजयजी काळे, सदस्या सौ. मंगला पवार नवजीवन विधी महाविद्यालयाचे  प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार, प्रा. एम. एस. पांडे, नाशिक विभाग सह संघटक अँड. सुरेन्द्र सोनवणे व आदर्श शिक्षिका श्रीमती प्रमिलाताई पाटील नाशिक महानगर संघटक श्री. प्रशांत देशमुख, नाशिक महानगर सचिव अँड. राजेंद्र शेवाळे, आदर्श शिक्षिका श्रीमती प्रमिलाताई पाटील, श्री. अनिल देशमुख, श्री. महेंद्र विंचूरकर,  श्री. संतोष गायकवाड, प्रा. पी.पी. सावरकर, प्रा. एस.एन. चव्हाण, प्रा. शालिनी घुमारे, प्रा. किरण क्षत्रिय, कर्मचारी वर्ग व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी  उपस्थित होते. 

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close