ताज्या घडामोडी

अखेर मजीतपूर आश्रम शाळेचे माध्य.मुख्याध्यापक व शिक्षक निलंबित

स्थानिक आमदार विजय रहांगडाले यांनी मिळवून दिला आदिवाशी विद्यार्थ्याना न्याय.

उप संपादक:विशाल इन्दोरकर

तिरोडा:महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणा-या अनुसूचित जमातीचे सामाजीक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन 1972-73 पासून क्षेत्रविकासाचा दृष्टीकोन स्विकारण्यात आला अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा आसावी या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची इ. १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली आहे गोंदिया जिल्ह्यातील मजीतपुर येथे आदिवासी विभागाची माध्य.व उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळा नियमितरित्या सुरु असून सत्र २०२२-२३ मध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा याकरिता दिनांक २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंत आदिवाशी आश्रम शाळा येथे क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व या क्रिडा स्पर्धेकरिता मजीतपूर येथील एकूण उच्च माध्यमिक गटातील १२० विद्यार्थी सहभागी झाले असून या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संपूर्ण जवाबदारी हि मुख्याध्यापक व संबधीत क्रिडा शिक्षकाची होती परंतु मजीतपूर येथील मुख्याध्यापक एस.के.थूलकर व क्रिडा शिक्षक एन.टी.लिल्हारे यांनी आपल्या कर्त्यव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले सहभागी विद्यार्थ्यांना ने-आन करण्याकरिता बसची सुविधा करणे गरजेचे होते परंतु मुख्याधापकातर्फे बसची सुविधा न पुरविता खाजगी मिनी मालवाहक (४०७) करण्यात आले व दिनांक २४ सप्टेंबर ला क्रिडा स्पर्धा संपताच या १२० विद्यार्थ्याना या मालवाहकामध्ये जनावरांप्रमाणे कोंबून आणण्यात आले असल्याने विद्यार्थ्याना प्राणवायूची कमतरता जाणू लागली व एकोडीजवळ १२ विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले त्यापैकी एका विद्यार्थिनीला गोंदिया येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले सदर प्रकरणाची माहिती लागताच तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी तातडीने आश्रम शाळेत भेट देऊन हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी शिक्षकांवर कार्यवाही करण्याबाबत आदिवासी विभाग अप्पर आयुक्त यांना आदेश दिले असता अवघ्या अर्ध्या तासात अप्पर आयुक्त यांनी आमदार महोदयांच्या तक्रारीनुसार मुख्याध्यापक एस.के.थुलकर व क्रीडा शिक्षक एन.टी.लिल्हारे यांना निलंबित केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close