महेबुबनगर येथे विजेचे खांब बसवा या मागणी साठी एमआयएम ने काढला मशाल मोर्चा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव शहरातील महेबूबनगर भागात विजेचे खांब नासल्या मुळे येथील लोक अंधारात राहण्यासाठी मजबूर झाले आहेत येथील लोकांनी तोंडीं व लेखी अनेक वेळा एम एस ई बी कार्यालयास सूचना केल्या आहेत परंतु याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता हे ज्या वेळी लक्षात आले त्याच वेळी याला वाचा फोडण्याचे काम एम आय एम चे ओबीसी शहराध्यक्ष नाजेर कुरैशी यांनी केले व महेबुब नगर भागात विजेचे खांब बसवा या प्रमुख मागणीसाठी एम एस ई बी कार्यालय येथे मशाल मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय अभियंता चौधरी यांनी 15 दिवसात 12 विजेचे खांब टाकतो असे लेखी आश्वसन दिले या आंदोलनात नाजेर खुरेशी, इस्माईल बागवान, नविद सिद्दिकी, मुश्ताक खुरेशी,करीम ,मोईन खूरेशी, खलेद खुरेशी,युसुफ खूरेशी,पठाण नाविद, जुनेद,जावेद खुरेशी यांच्या सह महेबुब नगर मधील नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला या आंदोलनाला सत्यभामा सौंदर्मल यांनी पाठिंबा दिला.