ताज्या घडामोडी

खजे कुटुंबाचा आदर्श प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा- सखाराम बोबडे पडेगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शिक्षणासोबतच आपल्या पाल्याला खेळाचे धडे देऊन देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवलेल्या खजे कुटुंबियांचा आदर्श संपूर्ण शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केले. रविवारी सायखेडा येथे खजे परिवाराच्या भेटीनंतर ते बोलत होते.

परभणी लोकसभा मतदारसंघातील सायखेडा ता. सोनपेठ येथील मुंजाजी खजे यांनी आपल्या मुलींना मूळ शिक्षणासोबत गोफण खेळाचेही धडे दिले. या खेळात त्यांच्या मुली संध्या आणि विद्या या दोघेही तरबेज असल्याचे हेरून त्यांना पुणे व नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण दिले .नुकतीच त्यांची बारा खेळाडू च्या भारतीय संघात परदेशात खेळण्यासाठी निवड झाली. यानिमित्ताने सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत खजे परिवाराच्या घरी जाऊन त्यांचे पालक मुंजाजी खजे व चुलते बळीराम खजे यांचा सत्कार केला. पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या मुलातील कला गुण पालकांना ओळखता आले पाहिजेत. ते ओळखून त्यानुसार आपल्या पाल्याच्या कलागुणांना वाव दिल्यास ते पाल्य आपल्या कुटुंबाचे नाव नक्कीच उज्वल केल्याशिवाय राहणार नाहीत. खजे परिवाराने ही आपल्या मुली मधील गुण हेरून त्यांना संधी दिली. त्या मुलींनी आपल्या गावाचचं नव्हे तर आपल्या देशाचे नाव यानिमित्ताने मोठे केले. यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष मुंजाभाऊ लांडे ,अंगद आळसे, लहू आळसे ,गबाळे रमेश आरशिडे आदींची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close