गोंडपीपरी तालुक्यातील कार्यकर्ते लागले रेती तस्करीच्या कामात कार्यकर्त्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त
शिवनी-राळापेठ घाटावरून रेती तस्करी सुरू
सेटिंग करूनच रेती तस्करी सुरू असल्याच्या चर्चेला उधाण?
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
गोंडपीपरी तालुक्यातील शिवणी- राळापेठ घाटावरून अवैध रेती तस्करी जोमाने सूरु आहे.
गोंडपीपरी तालुक्यातील मौजा राळापेठ व शिवनी घाटावरून रेती तस्करी जोमात सुरू झाली आहे.
अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत भ.तळोधी, राळापेठ-सालेझरी, शिवनी, पोणारा, नंदवर्धन दरूर ह्या परिसरातील बरेच कार्यकर्ते झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत राळापेठ व शिवनी घाटावरून रेती तस्करी करीत आहे.
पर्यावरन विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे रेती घाटाची लिलाव प्रक्रिया रखडली आहे.
याचाच फायदा घेत गोंडपीपरी तालुक्यात विविध घाटावरून रेती तस्करी सुरू आहे
महसूल विभाग मात्र मूग गिळुन गप्प बसले असल्यांने विविध शंकांना उत आला आहे.
गोंडपीपरी तालुका परिसरात वाहणाऱ्या नद्या, नाल्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे.
त्यामुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहेत.
अमुक पक्ष् चा कार्यकर्ता,तमुक पक्षचा कार्यकर्ते एकत्र येत नदी पात्रात जाणार रस्ता तयार करून
राजरोसपणे रेती चे अवैध उत्खनन सुरू झाले आहे.
तालुक्यात सुरू असलेल्या शासकीय व बिगर शासकीय कामात हे तस्कर चढत्या दराने रेतीचा पुरवठा करीत असल्याची तालुक्यात चर्चा केली जात आहे.
सदर कार्यकर्त्यांवर वरिष्ठ चा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
आणि प्रकरण सेट करूनच रेती तस्करी केली जात असल्याची तालुक्यात चर्चा केली जात आहे.