ताज्या घडामोडी

मुद्रांक विक्रेत्याची मनमानी व जनतेची करतात फसवणुक

मुद्रांक परवाना धारकाने स्टॅम्प पेपर सोडवावे नाही तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे -प्रशांत डवले यांची निवेदनातुन मागणी

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे

चिमूर :- खेड्यापाड्यातून शेतकरी, शेतमजुर व सामान्य जनता आपापले तहसिल कार्यालयाचे काम करण्याकरिता चिमूर तहसिलमधे रोज येत असतात. परंतु फक्त (मुद्रांक) स्टँप पेपर न मिळाल्यामुळे पुर्ण दिवस तर वाया जातो परंतु त्यांच्या रोजीची नुकसान पण होते व मुद्रांक विक्रेते स्वतः च्या फायद्यापोटी स्टँप पेपर विकत नाही.

परवानाधारक मुद्रांक विक्रेते हे १०० रु. चे स्टँप पेपर ११० रु.ला जादा शुल्क पक्षकाराकडुन वसुल करून विक्री करतात. त्याचप्रमाणे ५ रु. चे तिकिट ७ रुपयास विकतात. स्टँप विक्री करताना स्टँप उपलब्ध नाही असे सांगतात व स्टँप पेपर छपाई करित असल्यास मिळेल असे उतर देतात, मुद्रांक विक्रेते मनमानी करून जनतेची फसवणुक करतात.

त्यामुळे स्टँप पेपर साठी नागरिकांना विनाकारण त्रास होतो,नागरिकांना स्टँप व तिकीटासाठी भटकंती न करता तहसील कार्यालय परीसरात विक्री व्हावी तसेच काही मुद्रांक परवानाधारक स्टँप पेपर सोडवत नाही,त्यांच्यावर कारवाई करून परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत डवले यांनी केली आहे,अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close