शिक्षक कॉलनी व शिवाजीनगर पाथरी येथील अतिक्रमण तात्काळ हटवावे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
उपजिल्हाधिकारी श्री शैलेशजी लाहोटी साहेब यांना शिक्षक कॉलनी व शिवाजीनगर येथील रहिवाशी नागरिकांच्या वतीने येथील अतिक्रमण हटवावे अशी मागणी करण्यात आली.
शिक्षक कॉलनी व शिवाजीनगर येथील दोन रोडच्या मध्ये मोकळ्या जागेत माजी नगरसेवक व शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष हसीब खान याने केलेल्या अतिक्रमणावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना अलोक चौधरी, युवराज काटकर,गजेंद्र टोके,शिवप्रसाद जोगदंड,डॉ.अण्णासाहेब जाधव, राजेश मुंदडा,प्रशांत साळवे, ओंकार आवचार,रामेश्वर पितळे,नंदकुमार पोंडूळकर,गजानन पामे,रफिक अन्सारी, सतीश गाडगे, बापूराव चिंचाणे,बालाप्रसादजी कासट,पोपटराव फडतरे,जे.डी. कुलकर्णी,य.द.जवळेकर, सुनील उन्हाळे,गोविंद बाहेती, संतोष उंबरकर, युवराज शिंदे,शिवराज शिंदे,लिंबाजी निरजे,अनंत नेब, ॲड. दीपक कुलकर्णी, रफिक गुणके इत्पादिचे स्वाक्षरी आहेत.