ताज्या घडामोडी

नेरी मध्ये घरोघरी कृत्रिम पाणवठे


पर्यावरण संवर्धन समिती चा उपक्रम

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

पक्षी पर्यावरणाचा मौल्यवान घटक आहे. पक्ष्याशिवाय पर्यावरणाचा विचारच करु शकत नाही. तोच घटक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मानवाचा स्वार्थ पक्ष्यांच्या जिवावर उठला आहे. वृक्ष तोड, वनवा , जंगलतोड, रासायनिक खताचा बेसुमार वापर, मोबाइल चा अतिवापर, प्रदुषण, शिकार यामुळे पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

स़ध्या उष्णतेचा पारा वाढला आहे. पाण्यासाठी पक्षी वणवन भटकत आहे. पाण्याअभावी पक्ष्यांच्या मृत्यू होत आहे. कुठे पाणी मिळेल का ❓ यासाठी पक्ष्यांच्या चिवचिवाट कानी एेकु येत आहे. पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. ही भटकंती थांबवण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती नेरी कडून नेरी येथे घरोघरी झाडावर पक्षी घागर लावण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे, सुशांत इंदोरकर, तुशांत पिसे, सुदर्शन बावने, आधार गोडघाटे, मयुर कुंदोजवार, रुपेश घोनमोडे, राहुल गहुकर हे उपस्थित होते.

“उन्हाचा पारा वाढला असुन प्रत्येकांनी झाडांवर अथवा जिथे जागा असेल त्या ठिकाणी पक्षी जल पात्र ठेवण्यात यावे जेणेकरून पक्ष्यांची वनवन थांबेल व पक्ष्यांचे प्राण वाचेल””

कवडू लोहकरे
पक्षी प्रेमी नेरी

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close