मलमपल्ली येथे आ धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते गोटूल भवनाचे लोकार्पण

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुक्यातील मलमपल्ली टोला येथील गोटूल भवनाचे लोकार्पण अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम, नागेपल्ली चे उपसरपंच रमेश शानगोंडा, कांचनलाल वासनिक, किरण खोब्रागडे, विशाल रापल्लीवार,किशोर डकाटे,सारिका गडपल्लीवार, स्मिता निमसरकर,लक्ष्मी सिडाम,ज्योती ठाकरे,आशिष पटेल,दिवाकर मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
मलमपल्ली येथे 2515-1238 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत सन 2021- 22 मध्ये अंदाजित 6 लक्ष 39 हजार रुपये खर्च करून गोटूल भवन बांधकाम करण्यात आले. या गोटुल भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून नुकतेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
गावात प्रवेश होताच गावकऱ्यांनी आ धर्मराव बाबा आत्राम आणि इतर मान्यवरांचे जंगी स्वागत केले.आ धर्मराव बाबा आत्राम यांनी गावात आदिवासी समाज बांधवांसाठी गोटूल भवन बांधकाम पूर्ण झाले असून यापुढेही आवश्यक ती विकासात्मक कामे केली जाईल. आदिवासी समाजासाठी गोटूल भवन महत्त्वाचे ठिकाण असून या गोटूल भवनातून समाजासाठी योग्य निर्णय घ्या आणि समाजाची उन्नती करा असे आवाहन केले.