ताज्या घडामोडी

अखेर कंपनी प्रशासन आंदोलका पुढे नमले

युवासेनेचे मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला यश

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा-तालुक्यातील मजरा ( लहान) गाव शिवारात असलेल्या बीएस इस्पात कंपनीत गावातील बेरोजगारांना रोजगार द्यावा याकरिता गावातील ग्रामपंचायत कमिटी व गावकऱ्यांनी अनेकदा कंपनी प्रशासनाची भेट घेऊन आपल्या समस्या व मागण्या मांडल्या परंतु कंपनी प्रशासन त्याकडे कानाडोळा करून जाणीवपूर्वक गावातील मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवताच बीएस इस्पात कंपनी विरोधात ग्रामपंचायत कमिटी, तंटामुक्त समिती, शाळा व्यवस्थापन कमिटी तसेच गावकऱ्यांच्या वतीने गाव बंदीचा ठराव घेऊन युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस व शिवसेना तालुका संघटक मनीष जेठाणी यांच्याकडे धाव घेऊन आंदोलनाचे नेतृत्व करावे असा एकमताने ठराव मंजूर करून आंदोलनाचे नेतृत्व करावे याकरिता ठराव पत्र देऊन विनंती केली. तालुक्यातील आक्रमक नेतृत्व अशी ओळख असलेले मनीष जेठाणी यांनी तात्काळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मजरा गावाच्या समस्या घेऊन दोन दिवस गावबंदी करुन मनीष जेठाणी यांचे नेतृत्वात कंपनीचे काम बंद केले होते. वरोरा तहसीलदार यांच्यामार्फत दोन बैठका घेण्यात आल्या परंतु त्यात समाधान कारक चर्चा न झाल्याने अखेर तिसरी बैठक उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली. बैठकीत गावकऱ्यांच्या वतीने मनीष जेठाणी यांनी अनेक मुद्दे मांडले. कंपनी सुरू करताना दिलेल्या हमी पत्रानुसार गावातील 60 टक्के बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. सीएसआर फंडातून गावाच्या विकास होता की मदत करण्याचे आश्वासन पूर्ण करावे. लेबर कोर्टाच्या आदेशानुसार जुन्या कामगारांना कायमस्वरूपी कंपनीत समावेश करावा. अवैद्य खोदकाम करून पांदन रस्त्याच्या मधातून कंपनीने पाईपलाईन टाकण्यात आल्याने सदर पांदन रस्ते पूर्ववत करावे. मागील अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीचा लाखो रुपये कर थकीत असून तात्काळ त्याचा भरणा करण्यात यावा. कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई कंपनीने द्यावी इत्यादी मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन कंपनीने 30 एप्रिल पर्यंत 50 कामगार तर पन्नास कामगार 10 जून पर्यंत घेण्यात येईल, तसेच उर्वरित कामगारांना देखील कंपनी रोजगार देणार असल्याचे मान्य केले व इतर मागण्या मान्य करण्याची ग्वाही कंपनीने दिले असल्याने काही काळासाठी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे गावकरी उत्साही असून गावातील बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याने मुकेश भाऊ जीवतोडे व मनीष भाऊ जेठाणी यांच्यावर गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे आहे.
आंदोलन यशस्वी करण्याकरिता शिवसेनेच्या वतीने कामगार नेते अमोल बावणे, नगरसेवक दिनेश यादव, युवा सेना तालुका प्रमुख भूषण बुरीले, मीडिया सेल तालुकाप्रमुख गणेश चिडे, सरपंच वंदना निब्रड, उपसरपंच प्रमोद तोडासे, ग्रामपंचायत सदस्य सर्वस्वी हर्षद निब्रड, राजेंद्र बोंडे, अनिता आत्राम, प्रतिभा मानकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सारिका धाबेकर, उपाध्यक्ष गवशा गोबाडे,कामगार प्रतिनिधी संजय सुखदेवे,सुभाष लढोदिया,व सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे धनराज वांढरे व समस्त गावकरी महिला पुरुष, युवकाची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close