आता ग्रामीण क्षेत्रात लहानपणापासूनच दिले जाणार IAS बनण्याचे प्रशिक्षण. प्रा. डॉ. अजय पिसे यांचा अभिनव प्रयोग
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
ग्रामीण क्षेत्रात शिक्षणाची दुरावस्था हा चिंतेचा विषय आहे. सरकारी शाळांना शिक्षक भरती व चांगल्या सुविधा नसल्यामुळे गोर-गरिबांचे मुले शिक्षणापासून दुरावलेले आहेत. योग्य शिक्षण मिळत नसल्यामुळे लहान लहान मुले वाईट सवयींचे शिकार होत आहेत, यामुळेच बेरोजगारीचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
ग्रामीण भागातील मुलांना लहानपणापासूनच IAS च्या तयारीचे धडे मिळावेत व भविष्यात आपल्या या भागातून अनेक प्रशाशकीय अधिकारी तयार व्हावेत म्हणून आम आदमी पार्टी चे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात गायत्री ह. तिवसकर आणि पंकज यांनी ‘ब्रेनस्पायर’ या संस्थेची स्थापना केली असून लोकेश बंडे, विशाल इंदोरकर, मनीषा ब्राम्हणकर, संजना जीभकाटे या होतकरू युवक-युवतींनी यात सहभाग घेत कार्यशाळा सुरू केली आहे. या माध्यमातून गावोगावी ‘इनसायक्लोपेडिया’ या विषयावर लहानपणापासूनच शिक्षण देण्यात येईल यामुळे लहान मुलांची आधीपासूनच IAS ची तयारी सुरु होऊ शकेल. तसेच गावातील होतकरू युवक युवतींना ‘ब्रेनस्पायर’ च्या संकल्पनेतून ‘ब्रेनस्पायर’ केंद्र चालविण्याचा रोजगार उपलब्ध होऊ शकेल. या प्रयोगातून दुहेरी उद्देश साधण्यात येणार असून ग्रामीण भागातील होतकरू युवकांना रोजगार आणि नवीन पिढीला प्रशासक बनविण्याचे प्रयत्न केले जाणार आहे असे प्रा. डॉ. अजय पिसे यांनी सांगितले. या उपक्रमाला गावोगावी पोहचविण्यासाठी आप चे आदित्य पिसे, विलास दिघोरे, योगेश सोनकुसरे, मुकेश मसराम, प्रवीण चायकाटे, शंकरजी रामटेके, विद्याधर मेश्राम अथक परिश्रम करीत आहेत.