रेणाखळी जि.प.शाळेचे पाऊल पडते पुढे
प्रधानमंत्री पिएम श्री शाळा योजनेत निवड
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील असलेली रेणाखळी जिल्हा परिषद प्रा.शाळा या शाळेचे योग्य नियोजन व शिक्षक वर्गाची कठोर मेहनत व पालकवर्गाची साथ या त्रिवेणी संगमातुन शाळेची वेगाने प्रगती होत आहे
नुकतेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पिएमश्री शाळा योजनेत दुसरा टप्पा शाळेची निवड झाली आहे.
शाळेची शैक्षणिक प्रगती मध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ एन .एम. एम. एस. स्कॉलरशिप परीक्षेत २८पैकी २० विद्यार्थी धारक झाले असुन दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्गाच्या लोकसहभागातून २० कांप्युटरची सुसज्ज लॅब द्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण,ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रयोग शाळे द्वारे विद्यार्थ्यांना भौतिक व खगोलशास्त्राचे ज्ञाना द्वारे मुलांचा सर्वांगीण विकास साधत ग्रामीण भागातुन जि.प.शाळा नावारूपास येत आहे.रेणाखळी जि.प. प्रा.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उध्दव इंगळे व सदस्य, मुख्याध्यापक रमेश तांबुळे व जेष्ठ शिक्षक श्री पवार सर यांच्या नियोजनातून व शाळेतील शिक्षक श्री भामरे सर, विकास मामीलवाड,बाबळे,तुरे, कांबळे, साबळे मैडम,शेख अन्वर,एडके सर यांच्या कठोर मेहनतीने गेल्या पाच वर्षांपासून शाळेची पटसंख्या वाढत आहे.शाळेची पिएमश्री शाळा योजनेत निवड झाल्याने येणाऱ्या पाच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, स्मार्ट वर्ग , सुसज्ज खेळाचे मैदान, व ईतरांना आदर्शवत शिक्षण, या द्वारे शाळेचं आगळे वेगळे रूप निर्माण होइल.या सर्व स्तुत्य उपक्रम बाबत व पिएम श्री शाळा योजनेत निवड झाल्याबद्दल रेणाखळी गावचे सरपंच राहुल ब्रम्हराक्षे , चेअरमन दादाराव हारकळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुक्तीरामजी हारकळ, माजी विद्यार्थी ग्रुप,व गावकऱ्यांनी अभिनंदन केले.