ताज्या घडामोडी
दुचाकीची उभ्या ट्रकला धडक दुचाकीस्वार जागीच ठार
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
चंद्रपूर नागपूर महामार्गावरील मजरा (मोठा) गावाजवळ रोडवर उभ्या केलेल्या ट्रक ला (एम एच 34 बीजी 90 63) दुचाकीची धडक दिल्याने वरोरा तालुक्यातील बान्द्रा(येन्सा) येथील रहिवासी आशिष चंपक हक्के या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच 24तास सेवा ग्रुपचे सदस्य रूग्णवाहिका घेऊन घटना स्थळी पोहोचले व अपघातात जखमी ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मृतक हा दुचाकीची सर्व्हिसिंग करण्यासाठी वरोरा येथे आला होता.दुचाकी दुरुस्त झाल्यानंतर गावाकडे जात असताना हा अपघात घडला अशी माहिती मृतकाचे नातेवाईकांकडून मिळाली आहे.पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.