गंगाखेड येथे आमदार चषक राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे उदघाटन
‘राज्यभरातुन २५ महिला संघाचा सहभाग’
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
गंगाखेड- संत जनाबाई च्या पावन भूमित छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने व आनंदवन क्रीडामंडळाच्या संयोजनाने राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धा व परभणी जिल्हास्तरीय पुरूष गट कबड्डी स्पर्धेचे उदघाटन गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे.
या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंचा भरणा असलेले संघ राज्यभरातुन सहभागी होणार आहेत.
दि.२१ रोजी दुपारी ३ वाजता क्रीडाज्योत घेऊन खेळाडु व्यकंटेश विद्यालया पासुन भारतरत्न डाॅ.एम. विश्वेश्वरय्या क्रीडानगरी जायकवाडी वसाहत कोद्री रोड गंगाखेड पर्यंत खेळाडुच्या भव्य रॅलीने पोहचणार आहे.
सायंकाळी ५ वाजता स्पर्धेचे उद्घाटन आमदार डाॅ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण तर उद्घाटन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आनंदवन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेश राठोड, विशेष उपस्थिती जि.प सदस्य किशनराव भोसले, गणेशराव रोकडे,राजेश फड,प्रल्हाद मुरकुटे, पंचायत समितीचे सभापती छायाताई मुंढे, उपसभापती शांताबाई माने, प.स.सदस्य उषाताई पोले,लक्ष्मण मुंढे,नितीन बडे, पालम प.स.सदस्य बालाजी वाघमारे, नगरसेवक राधाकिशन शिंदे, सत्यपाल साळवे,राजु पटेल,रासप जिल्हाध्यक्ष ॲड.संदिप अळणुरे पाटील , विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, तालुका प्रभारी हणुमंत मुंढे, पालम -पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड , गुट्टे काका मित्र मंडळ गंगाखेड तालुका अध्यक्ष शिवाजी पवार,पालम तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे, पूर्णा तालुका अध्यक्ष गणेश कदम, रासप गंगाखेड तालुका अध्यक्ष शेषराव सलगर, रासप पालम तालुका अध्यक्ष बाळासाहेब कुरे, रासप पूर्णा तालुका अध्यक्ष जगन्नाथ रेणगडे, दलित आघाडी अध्यक्ष राहुल बनाटे,ओबीसी सेलचे ब्रीजेश गोरे,अल्पसंख्याक अध्यक्ष इकबाल चाऊस,पालमचे नगरसेवक पठाण उबेद्दुल्ला खान,पठान हैदर खान, मुबीन महेबुब कुरेशी,पठान समीर खान, महिला आघाडीच्या लक्ष्मीताई आडे यांच्या सह गंगाखेड परभणी जिल्ह्य़ातील क्रीडाक्षेत्रातील मान्यवर व खेळाडू उपस्थित राहणार आहेत .
या स्पर्धेमध्ये बलाढ्य महिलाचे संघ शिवशक्ती मुंबई शहर,राजमाता पुणे,होतकरू ठाणे,सुवर्णयुग पुणे,विश्वशांती मुंबई शहर,माऊली प्रतिष्ठान मुंबई उपनगर, कला व क्रीडा विकास प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, शिवशक्ती स्पोर्ट्स धुळे,एम.डी.स्पोर्ट्स पुणे,कुर्ला इ स्पोर्ट्स पालघर, साई स्पोर्ट्स औरंगाबाद, समता स्पोर्ट्स दहेगाव (नगर),आदर्श स्पोर्टस हिंगोली, मानवत स्पोर्ट्स मानवत, ज्ञानप्रबोधिनी पुणे,आनंदवन गंगाखेड, द्रोणा स्पोर्ट्स पुणे,त्रिमूर्ती नेवासा, लक्षद्वीप पुणे, उत्कर्ष सातारा,छत्रपती शाहूमहाराज कोल्हापूर, बारामती स्पोर्ट्स बारामती, आटपाडी स्पोर्ट्स सांगली, सिध्देश्वर लातुर, आदी संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धा २१ ते २४ फेब्रुवारीपर्यंत प्रकाशझोतात खेळवीले जाणार आहेत.स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे कोषाध्यक्ष मंगल पांडे, तालुका क्रीडाप्रमुख बाळासाहेब राखे, उपप्राचार्य प्रा.डॉ. चंद्रकांत सातपुते उपप्राचार्य,प्रा.भगवान भोसले, माणिक नागरगोजे, जयदीप फड,राजकुमार राठोड,प्रा.डॉ.लहु फड,श्रीराम राठोड, विनोद कुलकर्णी विलास राठोड, अवधुत गीरी, भगवान कातकडे,विठ्ठल ठुले, आर.बी. चव्हाण, संजय राठोड, अंकुश राठोड, किरण होरे यांच्यासह आनंदवन क्रीडामंडळ व तालुका क्रीडासमीतीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
गंगाखेड मतदार संघासह परभणी जिल्ह्यातील खेळाडू व नागरिकांनी राज्यस्तरीय कबड्डी सामने पाहण्यासाठी उपस्थित रहावे असे आव्हान विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.