ताज्या घडामोडी

विजेचा जबर शॉक लागल्याने इसमाचा मृत्यू

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा

तालुक्यातील मौजा धामणगाव येथिल 37 वर्षीय इसमाचा विजेचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना दि.17 ऑक्टोंबर रोज रविवारला धामणगाव येथे घडली आहे .
मृतकाचे नाव राजू बोरकुटे वय 37 वर्ष रा.धामणगाव असे असून . दि.17 ऑक्टोबर रोज रवीवारला आपल्याच घरी असलेल्या पीठ दळण्याच्या चक्कीत असलेल्या वीज मिटरची दुरुस्ती तथा पाहणी करीत असताना अचानक त्याला विजेचा जबर झडका बसल्याने तो कोसळला. विजेचा जबर झटका बसल्याने व कोसळल्याने
त्याला तत्काळ एका खाजगी
ऑटोत टाकून ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेहाची उत्तरणीय तपासणीकरून कुटुंबातील सदस्यांकडे त्याचा मृतदेह सोपविण्यात आला.
सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मृतकाच्या घरी बघ्याची गर्दी दिसुन आली.
मृतकाच्या पश्चात आई, पत्नी , मुलगी, मुलगा असा आप्त परिवार असून.त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close