ताज्या घडामोडी
शिरपूर येथे लंपी आजाराचे लसीकरण

ग्रामीण प्रतिनिधी:सुनिल गेडाम सिरपूर
चिमूर तालुक्यातील शिरपूर येथे गावातील जनावरांना लंपी आजाराची लागण होऊ नये आणि निरोगी राहावीत. या उद्दात हेतूने गावात घरोघरी जाऊन लंपी आजाराचे लसीकरण शंभर टक्के करण्यात आले.
सध्या जिल्ह्यात व राज्यात लंपी आजाराने थैमान घातले असून या आजारामुळे अनेक जनवारांचा मृत्यू झाला आहे. या आजारा पासून आपले गाव मुक्त राहावे या उद्देशाने शिरपूर येथे ग्रा. पं. च्या माध्यमातून गावात जनजागृती करून लसीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. वैशाली निकोडे, ग्रामसेवक श्री. एल. एन. भसारकर साहेब,तालुका स्तरावरील पशु्वैध्यकीय अधिकारी साहेब, आशावरकर सौ. ममता गावतुरे, पशुपालक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.