पोलीस मिञ परिवार समन्वय समिती कोल्हापूर विभागाच्या वतिने गरिब,निराधार ५० महिलांना साडी-चोळीचे वाटप
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दि .12/10/2021 ला पोलीस मित्र परीवार समन्वय समिती च्या वतीने वारणा कोडोली येथे समितीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशाप्रमाणे व सुभाषदादा सोंळके महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार, पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख माधुरीताई गुजराती यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला रणरागिणी सौ.प्रमोदनी माने पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वखाली नवरात्रीचे औचित्य साधून गरजु गरिब,निराधार महीलांचा व आशा वर्कर महीलांचा साडी चोळी देऊन करण्यात आले.दत्तमठ्ठी येथील वाघाची तालिम या मंडळात ह्या उपक्रम आयोजीत होता पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या सर्व पदधिकाऱ्यांचे स्वागत वाघाची तालिम मंडळाच्पा कार्यकर्त्यांनी केले.कोडोली गावातील जवळपास पन्नास (५०) मोल मजूरी करणाऱ्या गरिब,निराधार व आशा वर्कर महिलांची उपस्थीती. होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.सौ.प्रमोदिनी माने मॅडम यांनी केले व त्यांनी पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चे कार्य पध्दती, ध्येय-धोरणाविषयी सर्व माहिती देऊन,सर्व नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांची ओळख करून दिली.सोबतच त्यांनी संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ.संघपाल उमरे सर व महिलांचे नेतृत्व करणाऱ्या रनरागिनी पोलीस मित्र समन्वय समितच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा माधुरी गुजराथी मॅडम यांच्या कार्याची माहीती याप्रसंगी दिली.ठोमके सर,मा.पिसे सर,पिसे मॅडम,रेखा चौगुले मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच सौ घाडगे मॅडम,आशा वर्कर सौ. सुजाता गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात पन्नास (५०) निराधार महिलांना साडी-चोळी देऊन सन्मानित करण्यात आले.पोलीस मिञ परिवार समन्वय समिती समितिचे नवनिर्वाचित पदधिकारी श्री ठोमके सर,कु.भंडारे मॅडम,कु.शरवरी चौगुले मॅडम,शिंपी सर,मोरे सर,शुभांगी पाटील , मुजावर मॅडम,उज्वला पिसे,चंद्रकांत पिसे,सौ घाडगे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर उपक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे आभार सौ भंडारे मॅडम यांनी व्यक्त केले.याप्रसंगी वाघाची मंडळाचे कार्यकर्ते प्रदिप वावरे,विशाल डवनगे,श्रीनंद पाटील,मनोज वरेकर,अमर वरेकर,अमर पोवार,अजित मेनकर,स्वपनिल पाटील,नंदकुमार वरेकर,चेतन माने,जिवन आरडे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य व मदत केली एॅक्झक्टिव्ह ऑफीसर यशराज माने यांनी तरुण मुलांना आपल्या मार्गदर्शनामध्ये पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या सोबत काम करण्याकरीता प्रोत्साहीत केले.