ब्रम्हपूरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणाचा रुपडा बदलणार

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
ब्रम्हपूरी शहर हे वैद्यकीय नगरी, शिक्षण नगरी म्हणून अख्ख्या पुर्व विदर्भात नावारुपास आले आहे. अशातच क्रिडानगरी म्हणून देखील ब्रम्हपूरीची नवी ओळख निर्माण होत आहे. यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. ब्रम्हपूरीत जास्तीत जास्त क्रिडापटु तयार व्हावेत व त्यांनी विविध मैदानी स्पर्धांमध्ये सहभागी होत आपल्या कामगिरीने ब्रम्हपूरीचे नावलौकिक करावे यासाठी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे प्रयत्नरत असुन त्यांच्या विशेष प्रयत्नांतुन ब्रम्हपूरी शहरातील कृषी बाजार समितीच्या समोरील बाजुस असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावर नगर विकास विभागाच्या केंद्रीय सहाय्यता निधीतून ३ कोटी ५० लक्ष रुपयांच्या निधीतून विविध क्रिडा स्पर्धांच्या मैदानांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सदर पटांगण देखील लवकरच अत्याधुनिक क्रिडा मैदानांनी सुसज्ज होणार आहे.
ब्रम्हपूरी शहरातील अनेक क्रिडापटुंनी आतापर्यंत विविध प्रकारच्या मैदानी स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. मात्र या अनेक प्रतिभावान खेळाडूंना त्यांच्या आवडत्या खेळाचा सराव करतांना विशीष्ट प्रकारचे मैदान उपलब्ध नसल्याने सराव करतांना अडचणी निर्माण होत होत्या. याबाबत ब्रम्हपूरीतील खेळाडूंनी राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट घेतली होती. तेव्हा खेळाडुंची समस्या लक्षात घेत आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी विशेष प्रयत्न करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावर खेळांची मैदाने तयार करण्यासाठी नगर विकास विभागाच्या केंद्रीय सहाय्यता निधीतून ३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. सदर विकासकामाचे बांधकाम आता सुरू झाले असुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावर रनिंग ट्रॅक, अॅथलेटीक ट्रॅक, क्रिकेट, व्हाॅलीबाॅल, मैदान, बास्केटबॉल कोर्ट अशी सुसज्ज मैदाने तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सोबतच कॅंटीन फुड कोर्ट व मैदानाच्या बाजूला प्रसाधनगृह व शौचालयांचा देखील बांधकाम करण्यात येणार आहे. या नव्या मैदानांमुळे ब्रम्हपूरीतील क्रिडापटुंना आता सुविधांची वानवा राहणार नसुन क्रिडापटुंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ब्रम्हपूरी शहरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मैदानी खेळांची तयारी करणारे प्रतिभावान क्रिडापटु असुन विविध खेळांची सुसज्ज मैदाने तयार करण्यासाठी आम्ही क्रिडापटुंचे शिष्टमंडळ आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना भेटलो. त्यांच्या कडे मैदानांची मागणी केली असता तत्परतेने त्यांनी हे काम मंजूर केले आहे. त्यामुळे आम्ही सर्व क्रिडापटु त्यांचे आभारी आहोत.
निनाद गडे
राष्ट्रीय हाॅकीपटु तथा सचिव ब्रम्हपूरी हाॅकी असोसिएशन
ब्रम्हपूरी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावर क्रिडा विषयक मैदानाचे बांधकाम सुरू आहे. विरोधकांकडून मात्र सदर पटांगणावर व्यावसायिक गाळे बांधकाम सुरू असल्याची अफवा पसरवली जात आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. नगरपरिषदेची आगामी निवडणूक लक्षात घेता शहरातील विरोधी पक्षाचे काही हवसे नवसे कार्यकर्ते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचत असुन विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करीत आहेत.
विलास विखार
माजी बांधकाम सभापती न.प. ब्रम्हपूरी तथा सचिव जिल्हा काॅंग्रेस चंद्रपूर