ताज्या घडामोडी

प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथील लसीकरण विभागात जनतेच्या जीवाशी खेळ

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

अख्या जगामध्ये कोरोना आजाराचे थैमान असून या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लसीकरण मोहीम राबवीत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे आज दिनांक २०सप्टेंबर २०२१ रोजी लसीकरण विभागांमध्ये लसीकरण घेण्यासाठी गावातील जनतेने वेळेवर येऊन आपापल्या रांगा तयार केल्या परंतु लसीकरण विभागात तब्बल दोन तास उशिरा पर्यंत एकही कर्मचारी उपस्थित नव्हते. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी आरोग्य विभागात डाटा ऑपरेटर उपलब्ध नसल्यामुळे ग्रामपंचायत नेरी कडून डाटा ऑपरेटर यायचा आहे डाटा ऑपरेटर आल्यानंतर लसीकरण सुरू होईल अशी माहिती दिली. लसीकरण उशिरा सुरू झाल्यामुळे जनतेला लसीकरण घेण्यासाठी तब्बल दोन तास रांगेत उभे राहून वाट पाहावी लागली . लसीकरण विभागात लसीकरण घेण्यासाठी येणाऱ्या जनतेसाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हे विभाग जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे. जसे या विभागात जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही, येणाऱ्या जनतेसाठी सॅनीटायझर उपलब्ध नसून सोशल डिस्टंसिंग चा अभाव आहे,ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी या विभागाने व्यवस्थाच केलेली नाही. त्यामुळे हे विभाग पूर्णतः जनतेच्या जीवाशी खेळत आहे. यावर संबंधित वरिष्ठअधिकारी आणि पदाधिकारी यांनी लक्ष देऊन हा जनतेच्या जीवाशी खेळला जाणारा खेळ त्वरित थांबवावा अशी सर्व जनतेची मागणी आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close