पोलिस अधीक्षक रागसुधा आर यांचा पोलिस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने सत्कार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी पोलीस महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर .
पोलीस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर यांच्या कार्यकाळात परभणी जिल्ह्यातील नागरिकानां एमरजन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम अंतर्गत डायल ११२ या क्रमांकावर अपघाती नागरिक ,महिला ,बालक, मुली यांना तातडीने मदत झाली. वर्ष २०२३ मध्ये परभणी जिल्ह्यातील गरजुंना तात्काळ ८६३ व्यक्तिंना मदत झाली म्हणुन परभणी जिल्हा पोलिस विभाग महाराष्ट्रात दोन नंबर क्रमांकावर आल्या बद्दल पोलिस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्यातील पोलीसांचे कौतुक करत पोलिस अधीक्षक रागसुधा आर यांचा पोलिस हक्क संघर्ष संघटचे पदाधिकारी प्रदेश कार्याध्यक्ष गोपाळ कच्छवे, प्रदेश संपर्कप्रमुख धोंडीराम सातवने, जिल्हा सल्लागार गणेशराव सामाले, जिल्हा संघटक जलील पठाण, जिल्हा संपर्कप्रमुख सबदरभाई, तालुका अध्यक्ष संतोष रासवे, जिल्हा सचिव गणेश कांबळे, बालासाहेब गमे पाटील भागवत वाघ, सचिन बोबले ,निवृत्ती कदम यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.