कुंचेली येथे गाव तिथे दिव्यांग शाखेची स्थापना व बोर्डाचे अनावरण

शासन प्रशासनास दिव्यांग वृध्द निराधार यांच्या हक्काची जानिव व्हावी म्हणून गाव तिथे दिव्यांग शाखेची स्थापना अंतर्गत कुंचेली ता नायगाव येथे बोर्डाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या हस्ते संपन्न.

उपसंपादक:विशाल इन्दोरकर
नायगाव तालुक्यातील कुंचेली येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या शाखेचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
गावकर्यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मा चंपतराव डाकोरे पाटिल, जि अध्यक्ष ज्ञानेश्वर,नव़ले जी संपर्क प्रमुख नागोराव बंडे,ता अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर,गावकर्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांच्या हक्काची जानिव शासन प्रशासनास व्हावी, म्हणून गाव तिथे शाखा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गाव तेथे शाखा अभियान चालु असुन तळागाळातील दिव्यांग, वृध्द, निराधार बांधवांना संघटित करुन शासन प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी कुंचेली ता नायगाव येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र अशा प्रकारे गाव तेथे शाखा स्थापन करून संघटितपणे लढाईत सामिल व्हावे असे डाकोरे पाटिल यांनी आव्हान केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रावसाहेब पा बसवदे, श्रीपतराव डाकोरे, दिंगाबर भुरे,केरबा पा शिंपाळे, शादुल पटेल, गणेश बसवदे, दिंगाबर जोंधळे,गुलाब बोयाळ, केरबा बोयाळ, साहेबराव बोयाळ
,ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्ध पञक ता अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर यानी दिली.