गोल्डन अर्थ सोसायटीच्या वतीने चिमूर येथे महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण सभा सम्पन्न
उपसंपादक: विशाल इन्दोरकर
दि. ०५/०१/२०२२ रोज बुधवारी चिमूर येथील वडाळा येथे गोल्डन अर्थ सोसायटी तर्फे महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले.
महिलांना हाताला काम मिळावा, तसेच घरची कामे आटोपून त्यांना अर्थार्जन करता यावे या हेतूने गोल्डन अर्थ सोसायटी महिलांना स्वयंरोजगार चे प्रशिक्षण देते. तसेच संस्था कच्चा माल उपलब्ध करून देऊन पक्का माल विकत घेण्याची हमी सुद्धा देते. त्यामध्ये विविध प्रकारचे गृहउद्योग निवडण्याची संधी सुद्धा देते. तालुक्यातील खूप साऱ्या महिलांनी याद्वारे रोजगार सुरू केला आहे.
वडाळा येथे सुद्धा जवळपास २५-३० महिलांच्या उपस्थितीत रोजगार मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे चिमूर तालुका सुपरवायजर मनोजभाऊ तिजारे यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन करून माहिती दिली. संस्थेचे सुपरवायजर विलासराव दिघोरे(९२८४६५३२५७) यांनी अगरबत्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवून संपूर्ण माहिती दिली. फिल्ड ऑफिसर सौ वैशाली चन्ने मॅडम यांचा मोलाचा सहभाग लाभला. आणि इतर महिलांनी अगरबत्ती चे प्रशिक्षण घेतले. त्यांना काम आवडले. संस्थेद्वारे त्यांना मोफत कच्चा माल देण्यात आला आहे आणि ह्या महिला या रोजगाराद्वारे अर्थार्जन करन्यास प्रशिक्षित झालेल्या आहेत.