ताज्या घडामोडी
संस्थेला क्रिष्णा परिवार मधील महिलांनी दिली भेट
उपसंपादक: विशाल इन्दोरकर
मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशिय संस्था ही दिव्यांग, अनाथ ,अपंग ,विधवा व गरजू वंचितांसाठी कार्य करत आहे. त्यासाठी संस्थेचे कार्य बघून क्रिष्णा परिवारातील सौ. सारिका कुठवे, सौ. करूणा हातमोडे व सोनाली कांबळे या महिलांनी आज दिनांक २०/११/२०२१ रोजी नागपूर येथील संस्थेच्या कार्यालयात भेट दिली. कार्यालयात संस्थेचे संचालक श्री सुनिल जनबंधु तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शेंदरे उपस्थित होते.कार्यालयात भेट दिलेल्या महिलांनी संस्थेच्या कार्याची दखल घेऊन जे काही मदत लागणार आहे ती मदत करणार व मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशिय संस्था जे कार्य करत आहे त्यांची इतर ठिकाणी माहिती करुण जेणे करून पुन्हा संस्थेला योग्य मदत होईल. असे ते संस्थेच्या कार्यालयात बोलले.व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.