गोंडपीपरी-आष्टी मार्गावर ट्रक आणि – पिक अप ची जोरदार धडक
पीक अप चालक गंभीर जखमी
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
दि.21 फेब्रुवारी रोज सोमवारला गोंडपीपरी – आष्टि मार्गावर विठ्ठलवाडा गावाजवळ ट्रक-पीकअप ची जोरदार धडक बसली यात पीक अप चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला जवळ च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आलापली हून कोंडा(भुसा) भरून घुघुस मार्ग जाणारे ट्रॅक आणि नागपूर हुन फर्निचर घेऊन जाणारी पीक अप यांच्यात सकाळी 4 वाजता जोरदार धडक बसली. यात पीक अप वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.
ट्रक वाहनाचा क्रमांक एम एच 34 एम 2812 आणि पीक-अप वाहनाचा क्रमाक एम एच 49 ए. टी. 3296 आहे.
वृत्त लीहेपर्यंत चालकाची नावे कळली नाही.
नवेगाव ते आष्टि मार्गाचे रस्ते बांधकाम सुरू झाल्यापासून
या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहेत.रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने एकाकी मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. ठिकठिकाणी पुलाचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी एका साईड चा मार्ग खोदून ठेवलेला आहे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.