लोक कनिष्ठ महाविद्यालय नेरी येथील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
अकरावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन करून दिला निरोप
प्रतिनिधीःराहुल गहुकर
नेरी येथील लोक कनिष्ठ महाविद्यालमध्ये दि 31 जानेवारीला अकरावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करून निरोप दिला.
काही दिवसामध्ये अवघ्या अकरा दिवसात बारावीची परीक्षा सुरू होणार असून ही परीक्षा झाली की सर्व विद्यार्थी शाळा सोडून निघून जाणार आहेत तेव्हा त्यांना यश प्राप्त व्हावा बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश प्राप्त करावा जीवनात सफल व्हावे व शाळेचा नावलौकिक करावा तसेच परिक्षे संबंधी मार्गदर्शन मिळावा आणि शाळेचा नावलौकिक करावा यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना विधिवत निरोप समारंभ चे आयोजन करून निरोप देण्यात आला सदर कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन तो परीक्षेत यश प्राप्त करेल यासाठी त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीच्या सुयश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या निरोप समारंभाला मार्गदर्शन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष म्हणून आर के. राऊत उपाध्यक्ष युग प्रवर्तक सेवा मंडळ नेरी प्रमुख अतिथी सौ वर्षा मो वासेकर संचालिका युग प्रवर्तक सेवा शिक्षण मंडळ नानाजी पिसे संचालक, सौ किरण वी आष्टनकर सद्स शिक्षण मंडळ प्रमुख मार्गदर्शक म्हणून वि. डो. आष्टनकर से.नि.प्रा.लोक क.महा.वि. नेरी घनश्याम. स. पीसे से., शिक्षक लोक विद्यालय नेरी ईश्वर का. रदंये प्राचार्य लोक क.वी. नेरी. प्रा. दुर्वास ई. हटवार लोक क. महा. नेरी मोरेश्वर वासेकर राज्य कार्याध्यक्ष शिक्षकेतर महामंडळ या कार्यक्रमाचे सचांलन कु. दिक्षा ननावरे वर्ग अकरावी तर प्रस्ताविक प्रा. संगीता ढोले यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा ज्योती पिसे लोक कनिष्ठ महाविद्यालय नेरी स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.