गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या बिबट्याने केल्या फस्त
जिल्हा प्रतिनिधी:महेश शेंडे
गोंडपिपरी
गणपूर येथे बिबट्या ने हल्ला करून तीन बकऱ्या ठार केल्याची घटना शनिवारला घडली आहे.
शुक्रवारला
दिवसभर बकऱ्या चराईसाठी नेऊन रात्रौ ला गोठ्यात बांधून ठेवल्या होता.अश्यातच बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून बकऱ्यावर हला चढविला बिबट्या च्या हल्ल्यात तीन बकऱ्या ठार झाल्याची घटना गणपूर येथे घडली आहे.
ठार झालेल्या तीनही बकऱ्या सहदेव कुमरे रा.गणपूर यांच्या मालकीच्या आहेत . बिबट्याने बकऱ्या ठार केल्याने
त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली असती वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
गोंडपीपरी तालुक्यातील कन्हाळगाव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले .या अभयारण्यात हिंस्त्र वन्यजीवांचा अधिवास आहे.
अश्यातच
वनक्षेत्र सोडून वन्यजीव गावपरीसरात भटकत असल्याने पाळीव जनावरे तसेच मानव-वन्यजीवांच्या संघर्षात वाढ झाली आहे.
शनिवारला रात्रौ च्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून तीन बकऱ्या ठार केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.