संदिप गणवीर यांचा महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा द्वारा कोरोना योद्धा ने सन्मान
तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा
कोरोना महामारी काळी जग संकटात सापडले असता संदिप गणविर यांच्या सारख्या कोरोना योद्ध्यानी कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य सातत्याने उत्तमपणे पार पाडले. दवाखान्यांमध्ये आलेल्या रोगी यांचे एक्स-रे वेळेवर काढून देणे व ते त्वरित डॉक्टरांकडे पोहचविणे यामुळे आनंदवनातील फ्रक्चर असलेल्या पेशंटवरती वेळेवर उपचार करणे शक्य झाले.असे जोखमीचे काम करत असताना कोरोनाग्रस्ताच्या सतत संपर्कात आल्याने संदिप गणविर यांना कोरोनाने ग्रासले.त्यानी उपचार करत कोरोनावर मात केली.व बरे झाल्यावर पुन्हा रुग्णाची सेवा करून समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य सुरू ठेवले.कोरोना शोध मोहीम व लसीकरण मोहीम कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत स्वयंस्फुर्तीने केले.त्याच्या या कार्याची दखल घेऊन महारोगी सेवा समिती आनंदवन यांनी कोरोनायोद्धा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.