कराड मधील अवैध कत्तलखान्यावर डीवायएसपी यांच्या पथकाचा छापा

गोवंश जातीच्या 44 जनावरांची सुटका व गोमांसाचा साठा जप्त..
सात जणांना घेतले ताब्यात
प्रतिनिधीः प्रमोद राऊत कराड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डीवायएसपी अमोल ठाकूर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांचे वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील हवालदार प्रवीण पवार पोलीस नाईक सागर बर्गे दीपक कोळी यांना शहनिशा करण्याकरता कराड भाजी मंडई कसाई वाडा येथे पाठवले असता..तेथे एकूण पाच ठिकाणी गोवंश जातीची एकूण 40 जनावरे कत्तली करता बांधून ठेवल्याचे आढळून आले.. तसेच सुमारे 1580 किलो मांस कातड्यासह आढळून आले…तसेच मुजावर कॉलनी येथे देखील चार गोवंश जातीच्या गाई कत्तलीकरिता बांधून ठेवल्याचे आढळून आले.. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के एन पाटील डीबी पथक प्रमुख पतंग पाटील पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने आरसीपी पथक यांच्या साह्याने तात्काळ गोवंशाची सुटका करण्यात आली व त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली… तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष गोमांस जप्त करण्यात आले..सदर कारवाई मध्ये मज्जिद हमीद बेपारी यांच्या मालकीच्या शेडमध्ये अब्दुल रहमान बापूसाहेब बेपारी फारुख कुतुबुद्दीन बेपारी बशीर कादीर बेपारी नदीम अस्लम बेपारी मोहम्मद हरून बेपारी सर्व राहणार कुरेशी मोहल्ला कसाई वाडा गुरुवार पेठ कराड यांना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच वाहतुकीकरता वापरात असलेली दोन चार चाकी वाहने व एक तीन चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे..
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांनी केली