ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची व बियाणांची नमुने तपासूनच खरेदी करावे

शुभम मंडपे यांचे शेतकऱ्यांना आव्हान.

उपसंपादक:विशाल इंदोरकर

सध्या पावसाला सुरुवात झाली असून बळीराजा शेतकरी राजा पेरणीला व कंपास लागवड व धानाची परे टाकण्याच्या तयारीला लागलेला आहे , व रासायनिक खते व पेरणीकरिता सोयाबीन व धानाची सिड्स खरेदी करत आहेत , अशातच जिल्हातील व चिमूर तालुक्यातील कृषी केंद्रांमध्ये स्वदेशी व विदेशी कंपण्याची रासायनिक खते व बियाणे उपलब्ध झाली आहेत मात्र मागील वर्षी चिमूर तालुक्यामध्ये बोगस खताची विक्री व बियाणांच्या विक्रीमुळे बळीराजाची व शेतकऱ्याची जाहीर फसवणूक झाली होती व त्याकडे जिल्हातील व तालुक्यातील कृषी विभागाचे व कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले होते व
तरी या हंगामामध्ये रासायनिक खतांची व पेरणीकरिता सोयाबीन व अन्य बियानाचे नमुने तापासूनच खरेदी करावे अशे जिल्हातील व तालुक्यातील बळीराजाला व शेतक्यांना जाहीर आव्हान समाज कार्यात अग्रेसर असणारे शेतकरी नेते आंबोली ग्राम पंचायत सदस्य व वंचित बहुजन युवा आघाडीचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष शुभम भाऊ मंडपे यांनी केले आहे

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे व शेतामध्ये घाम गाळून या जगाला जगविण्याचे काम करीत असतो त्यामुळे आतातरी कोणालाही बळी न पडता आता तरी शेतकऱ्यांनी जागे होऊन रासायनिक खतांची व बियानाची नमुन्यांची तपासणी करूनच खरेदी करावे व जिल्हातील व तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून शेकऱ्यांना मदत करावे व बळीराजाची व शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये याकरिता उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी नेते व आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व वंचित बहुजन युवक आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष शुभम मंडपे यांनी केली आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close