ताज्या घडामोडी

गोंदेडा येथे दोन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

श्री गुरुदेव साधनश्रम गुंफा यात्रा महोत्सव समिती व श्री गुरुदेव गुंफा समिती गोंदेडा ता.चिमूर जि. चंद्रपूर यांच्या वतीने दि.28/जुलै/2026 ते 29/जुलै/2026 या दोन दोन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.


दि.28/07/2026 ला परिसर स्वच्छता, नोंदणी, सामुदायिक प्रार्थना व रात्रो भजन करण्यात आले व दि.29/07/2026 ला सकाळी परिसर स्वच्छता, सामुदायिक ध्यान,रामधून, मुर्ती पुजा, गुरु मंत्राचा जप व मार्गदर्शन प्रा.महादेवराव पिसे, प्रा. राम राऊत, डॉ. राम गभणे, विठृठलराव सावरकर, मारोतराव अतकरे, मिनाताई चौधरी, प्रा. निलकंठ लोनबले, संचालन नत्थुजी भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. भास्कर वाढई यांनी केले. आरती करून राष्ट्रवंदना घेण्यात आली. त्यानंतर व्रुक्षा रोपण करण्यात आले त्या नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यावेळी अनेक गुरुदेव कार्यकर्ते,दर्शनार्थी व पर्यटक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close