पाथरी येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. 12/01/2022 बुधवार रोजी पाथरी येथे सकाळी ठिक दहा वाजता सौ.रेखा मनेरे यांच्या निवासस्थानी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने संथापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने लहान मुलांना फळ वाटप करण्यात आले

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.लता रतन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती उदघाटकः सौ.शिला गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सुमन वामन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा. सौ. रेखाताई मनेरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व सुत्रसंचालनः सौ.मुक्ता नामदेव डोगंरे यांनी केले तर आभार सौ.विजयमाला गायकवाड यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रम सौ.मुक्ता डोगंरे, सौ.सुमन साळवे सौ.सुशिला मनेरे सौ.रेणुका सावळे सौ.मंगल सुरवसे सौ.शिला गायकवाड सौ.रेखा मनेरे सौ.मंदोदरी फंड सौ.लता साळवे व इतर सर्व महिला पदधिकारी यांनी प्रमुख उपस्थिती लावली आणि सहकार्य व परीश्रम घेतले अशा प्रकारे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि सर्व महिला पदधिकारी यांचे पुष्प गुछ देऊन सत्कार करण्यात आले मोठ्या उतसहात राजमाता जिजाऊ यांचा जन्म उत्सव सोहळा संपन्न झाला. अशा प्रकारे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.