ताज्या घडामोडी

आयुष प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल पाथरी येथे आषाढी एकादशी निमित्त ज्ञान दिंडीचे आयोजन

दिनांक 25 जुलै शनिवार रोजी आयुष प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल आदर्श नगर पाथरी येथे आषाढी एकादशी निमित्त ज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एम. ए कांबळे सर , अध्यक्ष अंश प्रतिष्ठान सेलू यांची उपस्थिती होती तर् प्राचार्य पी,. बि कांबळे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्थान भूषविले.

कार्यक्रमाचे संचलन श्रीमती पूजा ब्रह्मराक्षे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती श्रीदेवी आदमाने मॅडम यांनी केले.सकाळी ठीक आठ वाजता प्रस्तुत विद्यालयातून ज्ञान दिंडी काढण्यात आली.या दिंडीमध्ये अनेक बाल वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत येऊन दिंडीची शोभा वाढवली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी अभंग,भारुडे व गवळणी यांचे सादरीकरण केले . कार्यक्रमाच्या संस्थेच्या सचिव श्री बालाजी मकरंद सर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई च्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी,शिक्षक , प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close