ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत जिविका इंग्लिश मिडीयम स्कूल, भिसीची यशस्वी भरारी

ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भक्कम परंपरा जपणाऱ्या जिविका इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज, भिसीने राज्यस्तरीय इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा–२०२६ मध्ये पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.


यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या इयत्ता ४ थी मधील सहा विद्यार्थी आणि इयत्ता ७ वी मधील एका विद्यार्थिनीने यश मिळवून शाळेच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा, पालक आणि भिसी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता ४ थी मधील
कु. इनाया परवेज शेख,
कु. तन्वी गजानन गोहने
कु. रुची विजय डहाके,
कु. सोनिका प्रशांत कापसे,
पियूष अमोल बेलखोडे,
कु. लावण्या प्रविण काटेखाये तसेच इयत्ता ७ वी मधील
कु. जिविका किशोर आष्टनकर यांचा समावेश आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे प्रोत्साहन तसेच शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि परिश्रम मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या शाळेच्या शैक्षणिक वातावरणाचा हा यशस्वी परिणाम असल्याची भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायम राखण्याचा विश्वास व्यक्त केला.
“गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिविका इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज, भिसी सदैव कटिबद्ध आहे,” असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आधुनिक शिक्षणपद्धती, अनुभवी शिक्षकवर्ग आणि स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन यामुळे शाळेची शैक्षणिक वाटचाल अधिक सक्षम होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close