श्री साई कान्व्हेंटजिविका इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भिसी येथे स्नेहसंमेलन संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
तालुक्यातील भिसी येथिल श्री साई कॉन्व्हेन्ट,जिविका इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर सायन्स कॉलेज यांचे वतीने चिमुकल्या बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन व बालआनंद मेळावा पार पडला श्री विठ्ठल रुखमाई देवस्थानं भिसी च्या सभागृहात आयोजित तिन दिवसीय स्नेहसंम्मेलन व बालआनंद मेळाव्यात चिमुकल्यांनी एकापेक्षा एक अशी सरस नृत्य सादर करून भिसीवासियांना चांगलेच रिझविले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गरिबाजी निमजे व इतर मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करून उद्धाटन पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे तर प्रमुख पाहुणे म्हणून भिसी नगराचे प्रथम नगराध्यक्ष श्री अतुल पारवे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे अधिसभा सदस्य विजयकुमार घरत, आंबेनेरी केंद्राचे केंद्रप्रमुख ताराचंद रामटेके, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री भोंगाडे, माजी जि. प. सदस्या सौ ममताताई डुकरे, माजी प स सदस्य प्रदिप कामडी, चिमूर तालुका दैनिक देशोन्नती प्रतिनिधी मनोज डोंगरे, ज्येष्ठ नागरिक मारोती मानकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन गाडीवार, संचालक श्री किशोर आष्टनकर
श्री साई कॉन्व्हेन्ट च्या मुख्याध्यापिका शुभांगी आष्टणकर, जिविका इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक हर्षित उपाध्याय होते या मान्यवरांचे हस्ते प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली उपस्थीत मान्यवरांनी नर्सरी ते 12 वी पर्यंत च्या विद्यार्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले दरम्यान यशोदा बहुउद्देशीय शिक्षण संस्था व संस्थेद्वारा संचालित श्री साई कॉन्व्हेन्ट, जिविका इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर सायन्स कॉलेज चे वतीने प्रथम नगराध्यक्ष श्री अतुल पारवे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच शैक्षणिक सत्र 2024-2025 या सत्रातील 12 वी केन्द्र प्रथम कु राजवी बन्सोड,10 वी प्रथम कू. जानवी तिखट, नवोदय विद्यालय वर्धा येथे निवड झालेली कुं माही संजय गुल्हाने व शिष्यवृत्ती करीता निवड झालेली कु. इशिका किसन भोले या सर्व विद्यार्थांचा पालकांसोबत शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
प्रास्ताविक भाषणात शाळेचे संचालक श्री किशोर आष्टनकर यांनी कॉन्व्हेन्ट तसेच महाविद्यालय स्थापनेचा संघर्षमय प्रवास व उद्देश सांगून आपला विदयार्थी स्पर्धेच्या युगात कोणत्याही क्षेत्रात मागे पडू नये म्हणून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात यांची माहिती दिली.
अधिसभा सदस्य विजयकुमार घरत यांनी आपल्या भाषणात शाळेच्या प्रगतीत सर्वांचाच सिंहाचा वाटा आहे या महाविद्यालयातून उत्कृष्ट विद्यार्थी घडत आहेत आणि यापुढे सुध्दा घडत राहतील अश्या अपेक्षा व्यक्त करून शुभेछ्या दिल्या केंद्रप्रमुख ताराचंद रामटेके यांनी सुध्दा आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थांना मार्गदर्शन केले ममता डुकरे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून विद्याथ्र्यांचे कौतुक केले. अतुल जी पारवे यांनी आपल्या भाषणातून शूभेच्छा दिल्या
गरीबाजी निमजे यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणात जिविका इंग्लिश मिडियम स्कूल येथील विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाबाबत कौतुक करत या शाळेने भिसी च्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव अशी कामगिरी करत मानाचे स्थान पटकावले आहे. शालेय विद्यार्थ्यांची व शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत या शाळेचे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर व्हावे अशा शुभेच्छा त्यानी आपल्या उद्घाटनिय भाषणातून दिल्या.
तर अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांनी महाविद्यालयास व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यानी स्वागत सुंदर असे स्वागतगित गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉन्व्हेन्ट तसेच महाविद्यालयाच्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी कु. गुंजन गोहणे, ईश्वरी दडमल, यशस्वी गोहने, विजयालक्ष्मी भाकरे व खुशी वटाणे यांनी तर आभार प्रदर्शन शालेय विद्यार्थिनी कु. अनुष्का अरुण ठाकरे यांनी केले.









