ताज्या घडामोडी

उम्मे मुआविया (फराशा) शेख वाजिद हिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून नवा आदर्श निर्माण केला

उम्मे मुआविया (फराशा) शेख वाजिद हिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून नवा आदर्श निर्माण केला

पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले, त्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले आणि शिक्षकांनी प्रामाणिकपणे मार्गदर्शन केले तर यश निश्चित मिळते, हे पाथरीतील गुणवंत विद्यार्थिनी उम्मे मुआविया (फराशा) शेख वाजिद हिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE-2026) मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळा, पाथरी येथील विद्यार्थिनी उम्मे मुआविया (फराशा) शेख वाजिद हिने 300 पैकी 168 गुण (56 टक्के) मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्र (Qualified) ठरण्याचा मान मिळवला. तिने पहिल्या पेपरमध्ये 86 तर दुसऱ्या पेपरमध्ये 82 गुण मिळवले.

हे यश केवळ एका विद्यार्थिनीचे नसून आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व पालकांसाठी प्रेरणादायी आहे. आजचा अभ्यासू विद्यार्थीच उद्याचा डॉक्टर, अभियंता, शिक्षक, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि समाजाचा जबाबदार नागरिक बनतो. त्यामुळे पालकांनी मुलांना केवळ शाळेत पाठविण्यावर समाधान मानू नये, तर त्यांच्या शिक्षणाबरोबरच वाचनाची आवड, अभ्यासातील सातत्य आणि नैतिक संस्कार यांनाही प्राधान्य द्यावे.

उम्मे मुआविया शेख वाजिद हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे शिक्षक, पालक आणि पाथरीतील नागरिकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, तिच्या यशातून प्रेरणा घेऊन अधिकाधिक विद्यार्थी मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करून आपल्या पालकांचे, शाळेचे आणि पाथरी शहराचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close