वाय.एस.पवार कला वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबीरचे आयोजन
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
नेरी येथील वाय.एस.पवार कला व वाणिज्य महाविद्यालय नेरी यांचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबीराचे खुटाळा येथील ग्राम पंचायत कार्यालय व जि.प.ऊच्च प्राथमिक शाळा खुटाळा येथे दिनांक २५ मार्च ते ३१ मार्च २०२२ पर्यंत आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन २५ मार्च ला करण्यात आले उद्धाटक म्हणुन वाय.एस.पवार महाविद्यालयाचे संस्थापक सचिव मा. राजकमल चवरे हे होते कार्यक्रमाला उपस्थित प्रा.सुनिल गभने रा.से.यो. कार्यक्रम आधिकारी ,कु. मृणाली बोरकर सरपंच ग्रा.प. खुटाळा , श्री विनोद बारसागडे उपसरपंच खुटाळा , श्री गंगाधर श्रीरामे अध्यक्ष तंटामुक्त समिती खुटाळा , श्री कचरू श्रीरामे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती खुटाळा ,प्रा.धम्मदिप वैद्य प्राचार्य वाय.एस. पवार महाविद्यालय नेरी ,सौ. मिनाक्षी गायकवाड पोलिस पाटील खुटाळा ,श्री व्ही.एम नखाते ग्रामसेवक ग्रा.प. खुटाळा श्री कुहुरके सर मुख्याध्यापक जि.प.ऊच्च प्राथ. शाळा खुटाळा व सर्व ग्राम पंचायत सदस्य , बचत गट सदस्य , भजन मंडळ सदस्य व समस्त ग्रामवासीय तसेच वाय.एस. पवार महाविद्यालय नेरी येथील ,प्रा.मेहरकुरे सर ,प्रा. रामटेके मॅडम , प्रा. वाटगुरे मॅडम , लिपिक दिशांत रामटेके , शिपाई स्वप्नील डांगे, पराग चवरे , विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना पथक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. कऱ्हाडे मॅडम वाय.एस. पवार महाविद्यालय नेरी तर प्रास्ताविक प्रा.गभणे सर यांनी केले.