ताज्या घडामोडी

लोणी बुद्रुक येथे पोकरा अंतर्गत सोयाबीन पिकावरील महिला शेतीशाळा उत्साहात संपन्न

एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे मार्गदर्शन; जीकेव्हीएस बैठकीत ४० अर्ज निकाली

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सोयाबीन पिकावरील महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी धनराज जगताप व तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समूह सहाय्यक प्रदीप बर्मे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला.


महिला शेतीशाळेमध्ये सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पक्षी थांबे उभारणी, पिवळे चिकट सापळे बसविणे, मित्र कीटक व शत्रू कीटकांची ओळख, त्यांचे संवर्धन तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने कीड नियंत्रण करण्याच्या विविध उपाययोजनांची माहिती महिला शेतकऱ्यांना देण्यात आली. रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळून एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यानंतर जीकेव्हीएस (GKVS) बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत लाभार्थ्यांच्या विविध विषयांशी संबंधित ४० अर्ज निकाली काढण्यात आले, तसेच प्रलंबित प्रकरणांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनी शेतीविषयक विविध शंका उपस्थित करून तज्ज्ञांकडून त्यांचे निरसन करून घेतले. आधुनिक व शाश्वत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून सोयाबीन पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोणी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close