आयुष्यमान आरोग्य मंदिर बरडकिन्ही येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर

तालुका प्रतिनिधी:सनम टेंभुर्णे
ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही येथे मा.ना. श्री.देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री म.रा.), मा. प्रा.अतुलभाऊ देशकर (माजी आमदार, ब्रम्हपुरी) आणि मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार( आमदार बल्लारपूर तथा माजी मंत्री म.रा.) यांच्या वाढदिवसानिमित्य दि. 30/07/2026 ला भव्य निशुल्क नेत्र तपासणी शिबीर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बरडकिन्ही येथे मा. तनयभाऊ देशकर यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तपासणीला प्रचंड लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि लाभ घेतला. एकूण 239 नागरिक शिबिराला तपासणीला आले .

त्यापैकी गरजेनुसार 135 नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले आणि 77 लाभार्थ्यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया नागपूर येथील महात्मे आय बँक आय हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. याप्रसंगी मा. तनयभाऊ देशकर, मा. रामलालभाऊ दोनाडकर, प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी चे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित भुरले सर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बरडकिन्ही च्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.ओशीन बि. उपाध्ये मॅडम व सर्व आशा वर्कर आणि कर्मचारी उपस्थित होते.










