ताज्या घडामोडी

गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची संकल्प सभा संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी
मो.7620892397

श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यातील विकोपाला गेलेल्या वादावर तोडगा काढून कार्य सुरळीत पार पाडण्याकरिता तसेच प्रत्येक आश्रमातील गटातटातील वाद मिटवून एका छत्राखाली काम करण्याच्या उद्देशाने तपोभूमी गोंदेडा येथे संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. गवते महाराजांची निवड केल्यानंतर “गुरुदेव हमारा प्यारा” या संकल्प भजनाने सभेची सुरुवात झाली. सभेचे प्रास्ताविक करताना सारंग दाभेकर यांनी श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी, अध्यात्म गुरुकुल मोझरी व ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर येथील परमपूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांनी स्थापन केलेल्या कार्यस्थळा ची माहिती देऊन पुज्य दादांच्या समाधी नंतर या सर्व कार्यस्थळावर निर्माण झालेले वाद, सार्वजनिक कार्यस्थळ स्वतःच्या व कुटुंबाच्या नावाने करण्याचा गैरप्रकार, पंढरपूर येथील मंदिर कार्याकरिता देणगी च्या रूपाने लाखो रुपयाचा केलेला सेवकराम मिलमिले यांचा भ्रष्टाचार व नियमबाह्य, बेकायदेशीर व मनमानी कारभार याबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रामगीता सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर च्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री भुते गुरुजी यांची जीवित हानी होईल अशी प्रचारकाने केलेली परिस्थितीच्या व समितीचा संपूर्ण रेकॉर्ड कशा प्रकारे हिसकावून घेतला गेला या बाबत प्रत्यक्ष भुते गुरुजी यांनी सभेत माहिती दिली. या संपूर्ण बाबीच्या अनुषंगाने सभेत सविस्तर चर्चा झाल्यानंतर, सभेमध्ये तीन निर्णय घेण्यात आले. प्रचारक सेवकराम मिलमिले यांनी केलेल्या नियमबाह्य व गैरकृत्याचा निषेध करण्यात येत आहे. गुरुदेव कार्यातील विकोपाला गेलेली विवादित परिस्थिती सुधारण्याकरिता पुज्य तुकारामदादा गीताचार्य निर्मित प्रत्येक कार्यस्थळांच्या वादाची माहिती गावागावातील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यां पर्यंत पोहोचवावी व त्यांच्यात जनजागृती करून संघर्ष समिती स्थापण करावी. तसेच श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल समिती ,व्यवस्थापक रवि केशव मानव मोझरी, ग्रामगीता सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूरचे प्रचारक सेवकराम मिलमिले हे सध्या कार्यरत असलेल्या कार्यस्थळाच्या संपत्ती ची स्वतः चे स्वार्थापोटी लुटमार करीत असून ही कार्यस्थळे स्वतःच्या व कुटुंबाच्या नावाने करण्याबाबतच्या बेकायदेशीर प्रक्रियेवर श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भू-वैकुंठ समिती अड्याळ टेकडी या परम पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या मुख्य ठिकाणावरून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचा व त्यांना या सर्व कार्यस्थळावरुन तात्काल बाहेर काढण्याचा सुद्धा निर्णय करण्यात आला व तसे सभेतील उपस्थितांनी मोरेश्वर उईके अध्यक्ष आत्मानुसंधान भू-वैकुंठ समिती अड्याळ टेकडी यांना पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यास सांगितले. त्याच प्रमाणे सभेमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील मोझरी येथील सामुदायिक प्रार्थना मंदिर सह संपूर्ण आश्रमाचे जतन करण्यात यावे, गुरुकुंज आश्रम मोझरी येथील सर्वेसर्वा सचिव जनार्दनजी बोथे यांचेवर होत असलेल्या आरोपा संबंधात सुद्धा सभेमध्ये खुलेआम चर्चा करण्यात आली. संपूर्ण वाद कायमचे मिटविन्या करिता राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ या एकांच संस्थेच्या छत्र छायेत सर्व कार्यस्थळांचा कारभार चालविण्यात यावा दुसऱ्या संस्था निर्माण करू नये मात्र सध्या अशा कार्यस्थळावर कार्यरत सर्व कार्यकर्त्यांना मुख्य संस्थेचे सभासद करण्यात यावे व पूज्य तुकाराम दादा यांच्या संकल्पने प्रमाणे प्रत्येक कार्यस्थळाचे कार्य चालावे अशी सुध्दा चर्चा सभेत करण्यात आली. सभेत 43 गावातील शेकडो गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते महिलासह उपस्थित होते. तसेंच विशेष बाब म्हणजे या सभेत काय चर्चा होतात? व कोणते निर्णय घेतले जातात? आपल्या भ्रष्टाचाराचा विषय चर्चेला येतो काय? आपल्या गैर कृत्याची व आश्रम लुटमारीची माहिती तर सभेला झाली नाही ना? याची माहिती मिळविण्या करिता ग्रामगीता मंदिर पंढरपूर, अध्यात्म गुरुकुल मोझरी, व अड्याळ टेकडी येथील आश्रमाचे मठाधीश उत्तराधिकारी होण्याचे व आश्रम स्वताच्या, कुटुंबंयाच्या नावाने लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या व स्वप्न पाहणाऱ्या स्वार्थी, मतलबीयांचे पंढरपूर, मोझरी मिळून एक व अड्याळ टेकडी येथील एक असे दोन हेर सभेला उपस्थित होते. डॉक्टर रमेश येळणे, मोरेश्वरजी झाडे, भाऊसाहेब बराटे, शालिकजी वाढई, हरिश्चंद्र धोंगडे, विश्वनाथ भेंडारकर, किशोर गुरले, विठ्ठलराव माळवे, मायाताई पिसे,भारतीय क्रांतीकारी संघटनेचे डार्विन कोब्रा, कमलताई गुळधे, गिरजाबाई गायकवाड यांनी सभेत मार्गदर्शन केले. सभेचे संचालन सुधाकर पिसे गुरुजी यांनी केले तर सभा यशस्वी होण्याकरिता सभेची संपूर्ण व्यवस्था गजानन ठाकरे , नितेश वाकडे यांनी पाहिली.शांतीपाठ व गुरुदेवाचा त्रिवार जय घोष घेऊन सभेची समाप्ती झाली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close