चिमूर येथिल राजुला 25 वर्षानंतर शुभम पसारकर ने दिला आधार
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
चिमूर स्वभिमानी बाना व गोरगरीब जनतेची निःस्वार्थ सेवा करणारे शुभम पसारकर . स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण थोड दुसऱ्यांसाठी जगून पहायचं अस मनाशी ठरवून स्वतः ला सामाजिक कार्यात झोकून दिलं आहे स्वतच्या मताशी ठाम व विचाराशी कधीही तडजोड न करणारे रोडवरी बेघर ,बेवारस, भिक्षेकरी, निराधार ,अनाथ व सामाजिक क्षेत्रात चिमूर येथील अग्रस्थानी असलेले व्यक्तीमत्व असणारे शुभम पसारकर आज पर्यंत त्यांनी अनेक लोकांना आधार दिलेलं आहे तसेच चिमूर शहरातील एक परिस्थिती लक्षात घेता मनोरुग्ण राजू नावाचा व्यक्ती 25 वर्षापासून चिमूर या शहरात राहत होता त्याला कुठल्याही प्रकारची राहण्याची सोय व जेवणाची सोय नसल्यामुळे चिमूर या शहरात भटकंती करून भिक्षा मागून. आपला उदरनिर्वाह करत होता त्याची परिस्थीती जाणून घेता दिव्यवंदना फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम पासारकर यांनी मनोरुग्ण व्यक्ती राजू ची तात्काळ दखल घेतली व पोलीस स्टेशन व दिव्यवंदना आधार फाऊंडेशन अंतर्गत नागपूर येथे केंद्र शासन भिक्षेकरी पुनर्वसन केंद्र नागपूर महानगर पालिका येथे राजुच्या पुनर्वसना करिता दाखल करण्यात आले येत्या काही दिवसामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे उपचाराकरिता पाठविण्यात येईल उपचार झाल्यानंतर दिव्यवंदना आधार फाउंडेशन संपूर्ण जिम्मेदारी उचलेल शुभम पसारकर यानी गरजू लोकांकरिता मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे रोडवरील राहणाऱ्या लोकांना तातडीने मदत करून जीव व पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामधे रोडवरील राहणाऱ्या लोकांसाठी दिव्यवंदना आधार फाउंडेशन चे पहिले केंद्र जामगाव कोमटी भिशी येथे कार्य चालू आहे सर्व सामान्य लोकांशी नाड तोडलेली v माणुसकी जपणारी उत्कृष्ठ समाज सेवक म्हणून त्यांना ओडखले जाते सर्वसाधारण घरातील व्यक्ती शुभम पसारकर शादुल पचारे सामान्य जनतेची निःस्वार्थ सेवा करत आहे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रोडवरील गरजू लोक आढळल्यास संपर्क साधावा .9561855778