छत्रपती संभाजी महाराज यांचाराज्य अभिषेक सोहळा परभणीत साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
गुरुवार 16 जानेवारी रोजी मराठा समन्वय समिती व संभाजी ब्रिगेडच्या वतीने परभणी येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा 345 वा राज्य अभिषेक सोहळा संभाजी ब्रिगेड च्या वतीने साजरा करण्यात आला. परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात हा सोहळा पार पडला. छत्रपती शंभुराजे यांना सर्व शिवशंभु प्रेमींच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. सोहळ्या दरम्यान घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.यावेळी प्रमुख उपस्थिती संभाजी ब्रिगेडचे नितीन देशमुख , जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, शिवसेनाचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे,काॅग्रेसचे नेते रविराज दादा देशमुख,राष्ट्रवादीचे नेते अजय गव्हाणे,भाजपाचे नेते सुरेश भुमरे,युवा नेते सुधीर साळवे व तसेच , सूर्यकांत मोगल, स्वप्निल गरुड, अमोल अवकाळे, मुंजाजी खोडवे, कैलास वैद्य, गोविंद गिरी, संदीप गव्हाणे, गोविंद इक्कर, आदी जण उपस्थित होते.यावेळी शंभुराजे राज्याभिषेक सोहळा समिती व संभाजी बिग्रेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभाग होते.