ताज्या घडामोडी

पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वेळेवर मिळण्यासाठी प्रा.अमर शेख यांचा यशस्वी पाठपुरावा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.अमर शेख यांनी पदवीधर विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र संदर्भात येणाऱ्या अडचणी साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जावून माहिती घेतली, विद्यापीठातील एकमेव डिग्री राईटर ची दुसऱ्या सेक्शन ला बदली केल्यामुळे,गेल्या पंधरा दिवसांपासून अद्यापपर्यंत पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नसून पदवीधर विद्यार्थी विद्यापीठात चकरा मारत आहेत,यामुळे त्यांना वेळ व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, तसेच त्यांना नोकरीच्या ठिकाणी व इतर फॉर्म भरण्यासाठी पदवी प्रमाणपत्राची आवश्यकता असून यासंदर्भात प्रा. अमर शेख यांना अनेक पदवीधरांचे फोन आल्यामुळे त्यांनी तात्काळ विद्यापीठात जावून कमी कालावधीत लवकरात लवकर पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या प्रमुख तथा संचालक प्रा.भारती गवळी मॅडम यांच्याशी चर्चा केली,लगेच मॅडमनी डिग्री सेक्शन मधील सर्वच कर्मचाऱ्यांना बोलावून घेवून तीन ते चार दिवसात पदवी प्रमाणपत्र पदवीधर विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश दिले.याप्रसंगी सिनेट सदस्य डॉ.नरेंद्र काळे यांनीही यासाठी परीक्षा संचालकांशी संवाद साधून मार्ग काढण्यास सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close