शालेय व्यवस्थापन सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात,शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणाचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शाळा व्यवस्थापन समिती ही शालेय व्यवस्थापनावर आणि शालेय गुणवत्तावाढीसाठी नियंत्रण समिती असते.
याचे दोन दिवस तालुकास्तरीय प्रशिक्षण पूर्ण येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात
गट साधन केंद्र पूर्णा यांच्यामार्फत संपन्न झाले. प्रशिक्षणाचे उद्घाटन तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांनी केले याप्रसंगी जिल्हास्तरीय सुलभक म्हणून कैलास सुरवसे व महेश जाधव, साधन व्यक्ती अनिल ढाले हे उपस्थित होते.या दोन दिवसीय प्रशिक्षणात शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, लोकसहभाग, गुणवत्ता विकासात व्यवस्थापन समितीचे योगदान, आर्थिक व्यवस्थापन,निपुण भारत याबाबत सुलभक कैलास सुरवसे महेश जाधव त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी बालाजी कपसीकर म्हणाले की “शाळा व्यवस्थापन समित्या या प्रत्येक शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी दिशादर्शक असून शाळेचा आत्मा असतात ‘.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पिंपळा लोखंडे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर भोसले हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ढाले यांनी केले तर आभार व्यंकटरमण जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गटसाधन केंद्र पूर्णा येथील सर्व साधन व्यक्ती व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.