चिमुर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुण शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी

चिमुर राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे उपविभागीय अधिकारी यांना देन्यात आले निवेदन
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
चिमुर तालुक्यात मोठया प्रमाणात धान, सोयाबिन व कापसाचे पिकाची लागवड केल्या जाते. परंतु यावर्षी आलेल्या मावा, तुळतुळी, बोंडअळी व लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण पिक नष्ट झाल्याचे चित्र दिसुन येत आहे. या तालुक्यातील नागरिकांना शेतीशिवाय दुसरा पर्याय नसतांना शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात मोलमजुरी तर कोणी गहाण व कर्जाने धान व इतर पिकाचे महागडे बि-बियाणे घेवुन लागवड केली. धान पिकाची सर्वसाधारण वाट व उत्पादन कठीण स्थितीत असतांना परतीच्या पावसाने धान पिकावर परिणाम होवुन शेतकऱ्यांचे हातात आलेले धान पिक पुर्णतः नष्ट झाल्याच्या अवस्थेत आहे. महागडी पिक फवारणी सुध्दा कामात आलेली नाही. केमीकल युक्त तणीस जनावरांच्या उपयोगात येणार नाही तसेच कापसाचे पिकाला बोंडअळीने पुर्णतः नष्ट करून टाकले आहे. शेतकऱ्याचे नगदी
पिक समजले जाणारे कापुस पुर्णतः नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यात अत्यल्प उत्पादन होण्याच्या भितीने चिंताग्रस्त शेतकरी सोयाबिन, धान पिकाचे पुंजणे जाळुन टाकण्याच्या घटना सुध्दा घडत आहे.
चिमुर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे मौका चीकशी व सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवुन द्यावी. यासाठी चिमूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून रा.का तालुका अध्यक्ष योगेश ठुने
संजय रामटेके, प्रदीप वामन दुर्वे, सुधीर मांडवकर,सुधाकर हनवते,
अजय चौधरी ,दिवाकर नैताम
संजय भैसारे ,रमेश मडावी,तेजस शिरभये , किशोर भिमटे व राष्ट्रवादी कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते ऊपस्थीत होते .