विनोद लांडगे यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न सन्मान पुरस्कार

तालुका प्रतिनिधी: कल्यानी मुनघाटे नागभीड
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे या वर्षी चा राज्यस्तरीय शिक्षण रत्न सन्मान पुरस्कार विनोद विठोबा लांडगे विषय शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी कोके. तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांना प्राप्त झाला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या उपक्रमाची दखल घेऊन प्राप्त झाले आहे. लेखण , कला, विज्ञान, वत्क्रूत्व, शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मिळवलेला लोकसहभागातून, प्राथमिक शाळा डोंगरावर येथे सत्संग कॉन्व्हेंट निर्मिती ( लोकसहभागातून) जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा डोंगरावर येथे भव्य मैदान, सुंदर गार्डन स्वच्छ शाळा सुंदर शाळा २०१३ ला शासनाकडून पुरस्कार व रोख रक्कम ५० हजार रुपये, पायाभूत चाचणीत वर्गाची ऊत्तम सरासरी खो -खो खेळात जिल्हा स्तरावरील ५ दा प्रतिनिधित्व दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक, नवोदय साठी करण मडावी यांची निवड, शिक्षण, हक्क कायद्यानुसार १० घटनांची पूर्तता, ‘ शाळा बंद शिक्षण सुरू’ हा उपक्रम २०२१ मध्ये झाडाखालची शाळा हा उपक्रम सुरू केला त्यांच्या या विविध उपक्रमाची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यावर्षी राज्यस्तरीय गुरूगौरव शिक्षण रत्न सन्मान पुरस्कार जाहीर केले आहे. त्याबद्दल सरपंच यादवराव मेश्राम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद कीरीमकर शाळेतील मुख्याध्यापक बंडु राउत, मनोज मानकर, नालंदा खोब्रागडे, पी.जी.वाटकुरे , फुलसे व गावकरी यांनी अभिनंदन केले आहे.